
बेरोजगारांना सरकारी नोकरीची हमी देणाऱ्या
राजे करिअर अकॅडमीची सैन्य, पोलीस दलात भरतीमध्ये गरुड झेप
शासकीय नोकऱ्यांची उपलब्ध संख्या व वाढती बेरोजगारी यांचे भूमितीय परिणाम असल्याने सातारा शहरासह ग्रामीण भागातील होतकरू उमेदवार प्रशासनात निवडला जावून समाजसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रा. दत्तात्रय धोंडीराम कुंभार यांनी सातारा येथे १९९७ साली राजे करिअर अकॅडमीची स्थापना झाली. आज सर्वच शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये राजे करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्या अर्थाने राजे करिअर अकॅडमी म्हणजे सर्वार्थाने ऑल राऊंडर झाली आहे.
राजे करिअर अकॅडमीने अल्पावधीतच स्पर्धा परिक्षा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला असून विद्यार्थी पालक व समाजाचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, मुंबई, नागपूर, अकोला, गडचिरोली, धुळे या जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अनेकजण स्पर्धा परिक्षा तयारीसाठी केवळ राजे करिअर अकॅडमीमुळे ग्रामीण भागातील होतकरु, उमेदवारांना पोलीस व सैन्यदलात भरतीचा मार्ग खुला झाला असून पोलीस व सैन्य भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अग्रक्रमाने राजे करिअर अकॅडमीचेच नाव घेतले जाते.
भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरातील दिनक्रम भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना सकाळी ६ वाजता सक्तीने मैदानी चाचणी तयारीसाठी हजर राहावे लागते. सकाळी ६ ते ९ या वेळेत तज्ज्ञ शिक्षकांच्या निगराणीखाली रगडा फिजिकल तयारी करून घेतली जाते. संस्थेचे स्वतःचे मैदान उपलब्ध असून पुलअप्स, लांबउडी, गोळाफेक, ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक उपलब्ध आहे. तसेच व्यायामासाठी गोल्डन जिम उपलब्ध आहे. या सर्वसुविधा संस्थेकडे एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो.
सकाळी ११ ते ४ या वेळेत लेखी परीक्षा मार्गदर्शन व तदनंतर सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत रगडा फिजिकल करून घेतले जाते. तसेच महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे नुकतेच सेक्युरिटी असिस्टंट व सेक्युरिटी गार्ड यासाठी कोर्स सुरु झाले आहेत.
वाघाचं काळीज असणाऱ्या व मैदानी चाचणीमध्ये विशेष कामगिरी करू इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना तज्ज्ञ शिक्षक निवडून राजे करिअर अकॅडमीचा अभिमान असणाऱ्या टायगर ग्रुप मध्ये सामील करून घेतले जाते. या ग्रोउपमधील प्रशिक्षणार्थी सर्वांच्या आधी पहाटे पाच वाजताच मैदानावर सरावासाठी हजर असतात. सकाळी ५ ते ९.३० पर्यंत रफ अँड टफ फिजिकल करतात. राजे करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीला २०० मीटरही न पळू शकणारा विद्यार्थी टायगर ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर सलग १० ते १५ कि. मी. न थांबता पळू शकतो. या ग्रुपमधील उमेदवारांना विशेष आहार दिला जातो. संस्थेमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांची फिजिकलमध्ये होणारी प्रगती संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या संतुलित आहारामुळे शक्य होत आहे. सात दिवस दररोज वेगवेगळा, पण पोटभर अल्पोपहार दिला जातो. संस्थेमार्फत विशेष अब्यासक्रम आखून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या तयारीची गोडी लागावी म्हणून हॅप्पी एज्युकेशन योजनेंतर्गत विशेष तज्ज्ञ शिक्षकांमार्फत लेखी परीक्षा तयारीसाठी प्रशिक्षण दिले जाते. अकॅडमीतर्फे पोलीस भरती, सैन्य भरती, बँक भरती इत्यादी स्पर्धा परीक्षासंबंधी संपूर्ण १ वर्षाचे वेगवेगळे कोर्स सुरु आहेत. मुलींसाठी स्वतंत्र निवास व प्रशिक्षण व्यवस्था तसेच प्रवासासाठी संस्थेची स्वतःची बस व्यवस्था उपलब्ध आहे.
राजे करिअर अकॅडमीचे संस्थापक प्रा. दत्तात्रय कुंभार असे आवाहन करतात की, तुमच्या आयुष्यातील फक्त १ वर्ष आमच्या संस्थेत प्रामाणिकपणे द्या, स्टॅम्पपेपरवर संस्था तुम्हाला सरकारी नोकरीची गॅरेंटेड भरतीची लेखी हमी देईल, याशिवाय संस्थेच्या सांगली आणि नवी मुंबई येथे शाखा सुरु झालेल्या आहेत.
अधिक माहितीसाठी मुख्य शाखा राजलक्ष्मी थिएटर शेजारी, राजपथ, सातारा दूरध्वनी (०२१६२) २३००७८, विस्तारीत कक्ष - चक्रपाणी हाईट्स, गुरुवार पेठ, कमानी हौदाजवळ, राजपथ, सातारा, दूरध्वनी (०२१६२) २२८१३३, २३२३८६, नियंत्रण कक्ष राजे करिअर अकॅडमी सातारा, सज्जनगड रोड, डबेवाडी सातारा दूरध्वनी २०६२३० येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. दत्तात्रय डी. कुंभार यांनी केले आहे.